Monday 29 January 2018

नव्याने ऑडिओ लिंक्स लावून सर्व भाग पुन्हा क्रमाने सादर

नमस्कार मित्र हो,
गेले  महिने मंगला ओक यांच्या दोन्ही ब्लॉगच्या ऑडियो लिंक्स काम करेनाशा झाल्या होत्या.
खूप कटपट करून त्यांना नविन रुपात सादर केले आहे. 
आपण या कथनांचा आस्वाद घ्यावा. आणि आपला अभिप्राय जरूर कळवावा.
आपले स्नेहाभिलाषि,
नंदा करमरकर ( सुनीता ओक)
शशिकांत ओक
दोन्ही ब्लॉगच्या लिंक्स 
प्रवचनकार मंगला ओक ब्लॉग 1
प्रवचनकार मंगलाओक  ब्लॉग 2

Monday 29 April 2013

अश्वमेध यज्ञानंतर 15 वर्षांनी धृतराष्ट्र वनात जायला युधिष्ठिराची परवानगी मागतो ...

  आश्रम वासिक पर्व (15) अध्याय 1 ते 3 -

धृतराष्ट्राच्या मनात पश्चातापाचा उदय - वनात प्रस्थान करावयाचे निवेदन
 (ऑडिओ साठी इथे क्लिक करा)

अश्वमेध यज्ञानंतर ...उत्तम राज्यकारभार चालला असता ... धृतराष्ट्र युधिष्ठिराच्या राज्यात आश्रित म्हणून राहावे लागल्याने अंतःकरणात कुढत होता. विदुर, युयुत्सु व पांडवांनी त्यांची विचारपूस व सेवा करण्यात कधीच भेद केला नाही. युधिष्ठिराच्या प्रभावाने भीमसेनाशिवाय सर्व जण त्यांना योग्य सन्मान देत. परंतु भीमाबद्दल असलेली अढी व द्वेष धृतराष्ट्राला वारंवार त्रास देत असे.
मनातील सल पांडवांच्या प्रेमाने कमी होत होत 15 वर्षांनंतर तो एकदा म्हणाला, 'पंडुपुत्रांनो, मला माझ्या स्वार्थी व दुष्कर्मांची मला जाणीव झाली आहे. मला आता वनात जाऊन राहायची परवानगी तू द्यावीस. असे म्हटल्यावर उपस्थित व्यासांनी तशी अनुमती देण्याचे युधिष्ठिराला सुचवून 'विवेकाचा उदय वैराग्यातून होतो' असा उपदे केला. तेंव्हा त्यांना जायला परवानगी दिली जावी असे सुचवल्यावर, अति श्रमांनी घेरी आलेल्या धृतराष्ट्राच्या चेहऱ्याला युधिष्ठिराने अत्यंतिक प्रेमाने सुगंधी पाण्याने स्पर्ष केला तेंव्हा त्या प्रेमळ स्पर्षाने मोहरून गेलेल्या धृतराष्ट्राला आपल्या पुत्रांनी असा सेवा भावाने शरीर स्पर्ष कधी केला नव्हता याची प्रकर्षांने आठवण झाली.  धर्माच्या त्या हस्तस्पर्षांने पुत्र प्रेमाची अनुभूति त्याला झाली,  तेंव्हा उपस्थित सर्वांचे नयनाअश्रु पाझरले व शरीर गदगद झाले. असा तो ह्रदयस्पर्षी प्रसंग ऐकताना आपणही कसे नकळत भावनिक होतो... वनात जायला अनुमती व्यास देतात तेंव्हा त्यांनी केलेला सदुपदेश आदिचे कथन..


यज्ञातील पशु हत्येबाबत व्यास महर्षी आपले विचार सांगताहेत.

अश्वमेध पर्व पुढे चालू ...
यज्ञातील पशु हत्येबाबत व्यास महर्षी आपले विचार सांगताहेत. प्राचीन काळी एकदा  इंद्राने यज्ञ करत असताना अगस्ती ऋषीं यज्ञातील पशूहत्याकरून केलेल्या हवनामुळे व्यथित होऊन करुणेने म्हणाले,   'देवेंद्रा, पशु वध केलाच पाहिजे असे धर्मविधान नाही. हिंसा न करता ही यज्ञ करता येईल, पण ते इंद्राला मान्य झाले नाही. मग  लोकांत पशूवध सकाम यज्ञ म्हणून मान्यता पावला.  पण जीवाला मारून यज्ञ करावा असे नाही . धान्य वनस्पती वा किंवा जल अथवा आपल्या वाणीने जप अर्पण करून ही यज्ञ साधता येतो. असे करून सर्व जगाच्या कल्याणासाठी कोणी ही निष्काम भावनेने यज्ञ करू  शकतो. असे सामान्यपणे केले गेलेले दान कोणी ही करू शकतो. यज्ञ म्हणजे आपल्यजवळ असलेले आनंदाने दुसऱ्याला देणे हे होय.





अश्वमेध यज्ञामधे धुसून जाऊन मुंगुसाने निष्काम यज्ञाची महती कशी त्या वर्णनाची उजळणी MVI_3724. 27-12



अतिभव्य यज्ञात  हवन वेदपाठ, पशूंचे श्रपण व हवन केले गेले. यज्ञ मंडप चरबीच्या धुराने भरून गेले. युधिष्ठिराने व्यासांना पृथ्वीचा दान केले. त्यांनी ते दान कुंतीला परत  दिले. अचानक एक मुंगुस यज्ञ भूमित लोळण करून कुरुक्षेत्रातील एका गरीब ब्राह्मणाच्या यज्ञदानाचे वर्णन करून मानवी भाषेत म्हणाला, 'हे राजन, माझी मात्र या यज्ञात निराशा झाली कारण या यज्ञातून केल्या गेलेल्या दानाची बरोबरी त्या यज्ञ दानाशी झाली नाही.  विचारवंतांच्या बुद्धीला चालना देऊन मुंगूस निघून गेले. त्यावेळी चर्चेतून असे निष्पन्न झाले की सकाम यज्ञाचे फळ  हे  नेहमीच दुय्यम असते. युधिष्ठिराने केलेला यज्ञ मनः शांती व राज्यातील प्रजेच्या रक्षणासाठी व अन्य कारणांनी केला होता म्हणून तो सकाम होता. पण त्या गरीब ब्राह्मणाने केलेले आत्मयज्ञ दान हे याही पेक्षा श्रेष्ठ होते....
... युधिष्ठिराला केलेल्या दानाचा व वैभवाचा अहंकार होऊ नये म्हणून ही कथा घातलेली आहे....

ऑडिओ टेप इथे संपुर्ण कथनासाठी क्लिक करा

Sunday 28 April 2013

अर्जूनाच्या अश्वमेध दिग्विजयात विविध राज्यात काय काय अनुभव आले. त्याचे थोडक्यात वर्णन MVI_3723



या कथाभागाच्या शेवटाचे निवेदन - अर्जुनाच्या दिग्विजयात विविध राष्ट्रातील राजांचा त्याला काय काय अनुभव आहे त्याचे थोडक्यात वर्णन. त्रिगर्त,  आसाम - प्राग्जोतिषपुर, नरका सुराचा देश, सिन्धु देश -  जयद्रथाचा,  मणिपुरातील  - बभ्रुवाहनच्या राज्यात चित्रांगदा व नागा राजकन्या उल्लुपि देश, मगध -  चेदी - महिष्मती - शिशुपालाचा देश - दशार्णव - एकलव्याचा - द्रविड, सौराष्ट्र व प्रभासपट्टण करत द्वारकेत यादवांना निमंत्रण देत पुढे गांधार देशात गेला. सर्वांनी युधिष्ठिराचे सार्वभौमत्व स्वीकारून यज्ञाला यायचे मान्य केले. त्यामुळे कार्यसिद्धिचे समाधान पावून अर्जून हस्तिनापुरात परतला.



Wednesday 20 March 2013

महाभारत कथन भाग 3 - 2-35
  भीष्म म्हणतात, 'कुंति पुत्रांनो वासुदेवाचे गुणगान करा. त्याची अक्षर व परम गती लीला अगाध आहे.त्याला माझा नमस्कार आहे... माझी ही काळाने शिकार केलेली आहे.'
अनुशासन पर्वाला सुरवात...

महाभारत कथऩ भाग 1

 


मि 59.15 सेकंद
अष्टावक्र व सुप्रभा  या स्त्री मधील संवाद... स्त्री व पुरुष यातील विवाह - नाते संबंध यावरील भाष्य