Tuesday 19 March 2013

महाभारत कथनाचे प्रास्ताविक - मंगला ओक



गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळात मंगला ओक यांनी भारतीय संत परंपरेच्या  रामायण, श्रीमद भागवत, गीता, गुरूचरित्र, आदि महान ग्रंथांच्या व महानायकांच्या चरित्रांच्या अभ्यासक आहेत. गोड आवाज, सुंदर चाली, ओघवती भावपूर्ण रसाळ वाणी, अध्यात्मशास्त्राचा गाभा -  भक्ती मार्ग सामान्य जनांना सोप्या-साध्या भाषेत कथन करण्याची त्यांची विलक्षण हातोटी यामुळे  त्यांच्या कीर्तनाचे प्रवचनांचे कार्यक्रम अत्यंत रंगतात. 'कीर्तनभूषण' या पदवीने त्यांना पुर्वी सन्मानित केले गेले आहे. वयमानप्ररत्वे त्या बसून कार्यक्रम करतात.
स्व. पती जनार्दन ओक यांच्या प्रोत्साहनामुळे एक हौशी स्त्री कीर्तनकार म्हणून सुरवात केली. पुढे त्यातून त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक श्रोत्यांना आपापल्या जीवनात अध्यात्मिक आनंद मिळवायची प्रेरणा मिळाली आहे.
सांगली, इचलकरंजी, मिरज, माधवनगर, पुणे-मुंबई. व मराठवाड्यातील परांडा व अनेक शहरात व अगदी खेड्यातील मंदिरांपासून ते मोठ्या सभास्थानातून त्यांनी आपले कला गुण दाखवून चाहत्यांची मने शांत केली आहेत. त्याचा मुख्यतः स्त्री श्रोता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात दक्षिण महाराष्ट्रात व गोव्यात आहे. अनेक विद्वानांनी त्यांच्या कथा-कीर्तनाची प्रशंसा केली आहे. चिन्मय मिशनच्या पुज्य तेजोमयानंदांनी व सुप्रसिद्ध संतवाङ्मय अभ्यासक पुज्य कमाताई वैद्य आदींच्या कृपाशीर्वादाने त्या पुनीत झाल्या आहेत. 
महाभारतातील युद्धानंतरच्या शांततेच्या काळातील महाभारतातील पर्वातील  कथानक हाताळताना भीष्म - धर्मराज याच्यातील चर्चेतून व्यक्तिचे, जनसमुहाचे, समाजाचे, राष्ट्राचे, तसेच सत्ताधाऱ्यांचे, गुरूजनांचे, राजाचे व समाजपुरुषाचे कर्तव्य कर्म काय याची ओळख विविध गोष्टींच्या मधून व परस्पर चर्चेतून केलेली आहे. हा कथा भाग ऐकणाऱ्यांना विशेष आनंद देऊन जाईल यात संशय नाही.
आधी इस्लामपुर, नंतर माधवनगर, जयसिंगपुर, सांगली व सध्या पुण्याच्या पुर्वभागातील खराडी येथील पद्मश्री बेहेरे वृद्धनिवासात राहून त्या आपल्या अध्यात्मिक साधनेतून आत्मिक आनंद अनुभवत आल्या आहेत.
संपर्क पत्ता - मंगला ओक
c/o शशिकांत ओक.
ए - 4  /404 गंगा हॅमलेट हौ. सो. विमान नगर, पुणे. 411014.
मो. क्रमांक - 95525 60530.(मं),  9881901049(श),


1 comment:

  1. माझी माई,
    मी, माधव पर्वते, तुझ्या सुश्राव्य कीर्तनाचा व भावपुर्ण कथा कीर्तनांचा नेहमीच आस्वाद घेत आलो आहे.
    पुज्य ब्रह्मीभूत प्रज्ञानानंद सरसवतींच्या आशीर्वादाचे फळ व तुझ्या कष्टपुर्ण मेहनतीने मिळवलेल्या आध्यात्मिक ज्ञानकणांचा हजारो स्त्री-पुरुषांनी गेल्या 50 वर्षांत आस्वाद घेतला. आता वयाच्या 83व्या वर्षात महाभारतावरील महायुद्धोत्तर पर्वांचे रसाळ कथन ऐकताना वेद व्यासांच्या अदभूत कलाकृतीचा आवाका व अगाध प्रज्ञा शक्तीचा अविष्कार तुझ्या मुखातून ऐकताना अनेक आधीच्या प्रथितयश वक्त्यांनी निवेदन केलेल्या कथनापेक्षा तुझे कथन रसवाही व भावनिक वाटले. असेच अधिकाधिक भक्तिसरांमृत ब्लॉगच्या आधुनिकरुपाने उत्सुकांना मानसिक समाधान व आनंद प्रदान करो.

    ReplyDelete